लघुपाट बंधाऱ्याचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:31+5:302021-01-09T04:24:31+5:30

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेट सवना : सेनगाव तालुक्यातील सवना जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांनी ...

Release the water from the small dam | लघुपाट बंधाऱ्याचे पाणी सोडा

लघुपाट बंधाऱ्याचे पाणी सोडा

Next

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेट

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जानेवारी रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान शाळेतील सर्व शिक्षकांना शासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्याचे सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित

औंढा ना. : तालुक्यातील येहळेगाव सो. गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यासह शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामे करताना मोठी अडचण होत आहे. यासाठी गावासह शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातूर

औंढा ना. : तालुक्यातील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. याचबरोबर हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविला जात असल्याने पाऊस पडतो की काय, यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतातील पिकांवर अळीचाही प्रादुर्भाव दिसत आहे.

रस्त्यावर खड्डेच-खड्डे

हिंगोली : शहरातून अकोलाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून छोटे - मोठे वाहने धावत असल्यामुळे वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

हिंगोली - खांबाळा रस्ता उखडला

हिंगोली : शहरातील खांबाळा, जवळा, पळशीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने या रस्त्यावर वाहनाने तर सोडा साधे पायी चालणेही अवघड बनले आहे. ओबडधोबड रस्त्यावर पादचाऱ्यांचा तोल जाऊन ते पडत आहेत तसेच सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासाठी रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी वाहनधारक व पादचाऱ्यांतून होत आहे.

नाल्यातील पाणी रस्त्यावर

साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावातील नालीचे काम व्यवस्थित केले नसल्याने अनेकांच्या घरातील सांडपाणी नालीत न जाता रस्त्यावर साचत आहे. यामुळे रस्त्यासह गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना वाहन चालविणे अवघड बनले आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे.

बसस्थानकात बसेस येईना

सेनगाव : तालुक्याच्या ठिकाणी बाहेरुन येणाऱ्या अनेक बसेस या बसस्थानकात न येता सेनगाव येथील जिंतूर टी पाईंटवरूनच पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रवासी बसस्थानकात बसची प्रतीक्षा करीत असतात, पण अनेक बसेस बसस्थानकात न येता जिंतूर टी पाईंटवर थांबा देत पुढे जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

Web Title: Release the water from the small dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.