‘वीजबिल’ रक्कम जास्त घेतल्यास थेट तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:17 AM2018-03-20T00:17:15+5:302018-03-20T00:17:15+5:30

ग्राहकांना वीजबिल सहजरीत्या भरता यावे, याकरिता महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून विविध सुविधा केल्या आहेत. आता यामध्ये वक्रांगी केंद्राची भर पडली असून सदर सेवेचा लाभ घेत वीज ग्राहकांना बिलभरणा करता येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

 Report directly if 'Electricity bill' is taken more | ‘वीजबिल’ रक्कम जास्त घेतल्यास थेट तक्रार करा

‘वीजबिल’ रक्कम जास्त घेतल्यास थेट तक्रार करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्राहकांना वीजबिल सहजरीत्या भरता यावे, याकरिता महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून विविध सुविधा केल्या आहेत. आता यामध्ये वक्रांगी केंद्राची भर पडली असून सदर सेवेचा लाभ घेत वीज ग्राहकांना बिलभरणा करता येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली सेवा देणाऱ्या वक्रांगी केंद्रामध्ये आता महावितरणची वीजबिले स्वीकारली जाणार आहेत. ही सुविधा मागील एका महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. महावितरणने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत कुठल्याही विभागातील वीजबिले भरण्याची आॅनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता सर्व बिलांचा भरणा केंद्राच्या ठिकाणीच करता येणार आहे. पूर्वी ज्या-त्या विभागातील वीज बिल त्या-त्या भरणा केंद्रावरच भरण्याची सुविधा होती. आता मात्र आॅनलाइन सुविधेमुळे कोणत्याही केंद्रावरून बिल भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात महावितरणच्या वक्रांगीची तब्बल ३५ बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोलीत मानका कॉम्पलेक्स बुरूड गल्ली, चित्रालॅब जवळ शिवाजी नगर, तर तालुक्यात समगा, बोराळा, लोहगाव, सिरसम, कनका, माळधमणी, सावरखेडा तसेच कनेरगाव नाका येथील अमृता ड्रेसेस, आखाडा बाळापूर येथील गजानन कंप्युटर, औंढा तालुक्यातील पूर, काकडधाबा, गलांडी, येळेगाव, गोळेगाव तर सेनगाव तालुक्यातील जांभरुन बु. सिनगीनागा, पानकनेरगाव, आजेगाव, वरुड चक्रपान, कोंडवाडा, लिंबाळा, आमदरी, पळशी, आडोळ, कहाकर बु., जयपुर, सुलदली बु. आणि कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ, रेडगाव, वसमत तालुक्यातील हयातनगर आदी गावांचा समावेश आहे.

Web Title:  Report directly if 'Electricity bill' is taken more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.