राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:24 AM2018-09-04T01:24:58+5:302018-09-04T01:25:13+5:30
जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत व पीकविमा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत व पीकविमा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी संततधार पावसानंतर सोयाबीन पिकावर करपा रोगासह खोडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामध्ये शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल असून तणावाखाली आहे. त्याला दिलासा देण्यास मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ.रामराव वडकुते म्हणाले, जिल्ह्यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना मदत मिळण्यासाठी पंचनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर करण्यात आली. आज जिल्हाधिकाºयांकडेही ही मागणी केली. निवेदनावर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, बी.डी. बांगर, बालाजी घुगे, सुमित्रा टाले, देवीदास कºहाळे, जावेद राज आदींच्या स्वाक्षºया आहेत.