मुंबईतील लाठीचार्जच्या निषेधार्थ निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:48 AM2019-08-28T00:48:40+5:302019-08-28T00:49:00+5:30
अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईतील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलीस प्रशासनाने केलेला अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २७ आॅगस्ट रोजी औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईतील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलीस प्रशासनाने केलेला अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २७ आॅगस्ट रोजी औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर केले.
सरकारच्या हुकुमशाही कृत्याचा प्राध्यापक शिक्षक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शिक्षकांची सहनशीलता संयमाची मर्यादा संपली आहे. आता शिक्षकांच्या संयमाचा अधिक अंत पाहू नये. आपण संवेदनशील असाल तर घडलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे प्रायश्चित्त म्हणून याप्रकरणी तत्काळ अनुदान घोषित करावे, अशा या संदर्भात निवेदन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले की, विनाअनुदानित शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक अट न घालता व निव्वळ पोकळ आश्वासन न देता शंभर टक्के अनुदान मंजूर करण्यात आले पाहिजे. निवेदन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना देण्यात आलेली आहे. या निवेदनावर औंढा तालुक्यातील शिक्षकांच्या सह्या आहेत. हे निवेदन प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर राज्य अध्यक्ष महेश ठाकरे, किरण राठोड, शेषराव बांगर, ज्ञानदेव गिरी, एम.एन. कुलकर्णी, यु. एस. स्वामी, विजय सिदेवार, आर.जाधव, अंतेश्वर अमरबडे, जे. एस. इंगोले, पी.बी. सारंग, एस. टी. मोरे, अंबादास कºहाळे, आर. पी. बोबडे, एस. वाय. दराडे, व्ही. आर. मुंढे, के.एल. सांगळे, जी. एन. भारती, डी. एस. शेटे, बी. ए. पांचाळ, पी. व्ही. गुडेवार या शिक्षकांच्या या स्वाक्षºया आहेत.