पं.स.सदस्यांचे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:54 AM2018-11-14T00:54:50+5:302018-11-14T00:55:45+5:30
पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत.
औंढा नागनाथ पंचायत समिती २०१७ पासून निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य यांना जनतेची कामे करण्यासाठी निधी दिला जात नाही. मासिक बैठकीशिवाय कुठल्याही कामकाजात सदस्यांचा समावेश नाही. यामुळे थेट जनतेचे काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जनतेकडून अपेक्षा तर व्यक्त होतात, परंतु एकही काम सदस्याला करता येत नसल्याने या सदस्यांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे पंचायत समिती सभापती भीमराव भगत, उपसभापती रामप्रसाद कदम, सदस्य भिमराव कºहाळे, सुरेश कुंडकर, मंगल रिठे, सुभद्राबाई ठोंबरे, शरद नाईक, ज्ञानोबा गारोळे, निर्मला दळवे, बालाजी बोडखे, जिजाबाई डुबे, संजय नागरे, सुधा आकमार, संगीता ढेकळे, भगवान कदम, निता गिरे, उज्वला खिल्लारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे पाठविले आहेत.
पंचायत समितीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या करून त्या जिंकल्या. मात्र सभागृहात आल्यावर येथे जनतेची कामे करण्यासाठी कोणताच निधी उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सगळीकडेच पंचायत समिती सदस्यांमध्ये घुसमट आहे. एकतर तालुक्याच्या ठिकाणचे एकेकाळचे महत्त्वाचे असणारे हे कार्यालय आता केवळ नावालाच उरले. त्यातही पदाधिकाºयांना तर काहीच वाव नाही. एकतर पं.स.ला सक्षम करा अन्यथा हा स्तरच कमी करा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.