‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त केला संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:21 AM2018-04-08T00:21:36+5:302018-04-08T00:21:36+5:30
सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार हिंगोली येथील जि. प. सभागृहात ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, मुलींचे शिक्षण, महिलांचे स्वावलंबन व त्यांचा सामाजिक दर्जा उंचावेल याबाबत जनजागृतीचा यावेळी संकल्प करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ‘सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार हिंगोली येथील जि. प. सभागृहात ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, मुलींचे शिक्षण, महिलांचे स्वावलंबन व त्यांचा सामाजिक दर्जा उंचावेल याबाबत जनजागृतीचा यावेळी संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, दाताळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) गणेश वाघ, डॉ. मुदुर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. साथरोग अधिकारी गणेश जोगदंड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश पोहरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, श्रीपाद गारुडी, डॉ. गजानन चव्हाण, विजय भालेराव, अझर अली आदी उपस्थित होते.
सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार यंदा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने हे घोषवाक्य निवडले असून त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयक विविध योजनांची जनजागृती व आरोग्य सेवा या विषयावर सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, मस्के, शेख मुनाफ, सचिन करेवार, राहुल दरगु, माखणे, पतंगे, संदिप मुरकर, अझर अली, केदारी नागनाथ, शिवाजी गाढे, चौफाडे, रणविर, राजु पुंडगे, उबाळे, नितिन बुर्से, बोरकर, घुगे, थिटे, नरोटे, कमलेश ईशी, राहुल मोरे, कुलकर्णी व आरोग विभागातील कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयां तर्फे सत्कार करण्यात आला.
सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार प्रा. बाळासाहेब साळवे, प्रा. किशोर इंगोले, प्रा. सुखदेव बलखंडे, आर. जी. गीरी, प्रा. मदन मार्डीकर यांनी आरोग्य विषयक मागदर्शन केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभागा तर्फे आरोग्य विषयक मार्गदर्शनासाठी मान्यवरांना बोलाविण्यात आले होते. यावेळी विविध आजार व त्यावर घ्यावयाची काळजी तसेच उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, टी.बी. मुक्त भारत अभियान, राष्टÑीय किटकजन्य रोग नियंत्रण, दुर्धर आजारी लोकांना आर्थिक मदत, असांसर्गिक रोगाचे निदान व उपचार,