‘रात्रवस्ती’ बस उपक्रमाला प्रतिसाद मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:45 PM2017-12-01T23:45:12+5:302017-12-01T23:45:18+5:30
रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना अजूनही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बसमध्येच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे. वाहक-चालकांनासोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र या उपक्रमाला गावातील सरपंचांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना अजूनही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बसमध्येच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे. वाहक-चालकांनासोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र या उपक्रमाला गावातील सरपंचांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
एसटी वाहक -चालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दरवर्षी एसटीमधील कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करून कर्मचाºयांवर योग्य उपचार केले जात असले तरी, रात्रवस्ती बसवर कार्यरत वाहक-चालकांची दयनीय अवस्था आहे. ग्रामीण भागात रात्रवस्तीसाठी जाणाºया बसचालक - वाहकांच्या राहण्याची पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा नसते. तशा तक्रारीही मध्यवर्ती कार्यालयाकडे प्राप्त आहेत. सदर सोयीसुविधा बºयाच ठिकाणी उपलब्ध नसल्याने चालक-वाहकांना पुरेशा आराम मिळत नाही. अपुरी झोप व दिनचर्या सुरळीत होत नसल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी विभाग नियंत्रकांना परिपत्रकानुसार सूचना दिल्या होत्या. सूचनेप्रमाणे विभागातील आगार व्यवस्थापकांनी रात्रवस्तीसाठी बसेस जात असलेल्या संबंधित गावांना भेटी द्याव्यात. गावातील सरपंच यांच्याशी पत्रव्यवहार करून व विभाग नियंत्रकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी पत्रव्यवहार करावा. शिवाय समक्ष भेटी घेऊन रात्रवस्तीसाठी जाणाºया बसेसच्या चालक वाहकांना राहण्यासाठी तसेच त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, व स्वच्छतागृहाची आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावी. परंतु पत्रव्यवहार करूनही एसटी महामंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद मिळत नाही. शिवाय गावातील सरपंच याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाहक -चालकांच्या आरोग्य व सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात टाळण्यासाठी हा नवीन उपक्रम एसटीने हाती घेतला होता.