जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:30 AM2021-02-10T04:30:06+5:302021-02-10T04:30:06+5:30

या प्रदर्शनासाठी उपकुलगुरु डॉ. गणेशचंद्र शिंदे, माजी प्राचार्य ज. मु. मंत्री, माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार,सहाय्यक धर्मादाय आयुक्त,‍ ...

Response to District Level Science Exhibition | जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद

googlenewsNext

या प्रदर्शनासाठी उपकुलगुरु डॉ. गणेशचंद्र शिंदे, माजी प्राचार्य ज. मु. मंत्री, माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार,सहाय्यक धर्मादाय आयुक्त,‍ रवींद्र धायतडक, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के प्रा. त्रिंबक केंद्रे, आशिष बडवणे, डॉ. संतोष कल्याणकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. शिंदे यांनी केवळ सुविधांच नव्हे, शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा असल्याचे सांगून कौतुक केले. यामध्ये मॉडेल मेकींग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – रायझन स्कूल शिरडच्या श्रावणी संजय मोरे व महेश शामराव जऊळकर, द्वितीय क्रमांक – अन्नपूर्णा कलगावच्या शुभम शामराव सरनाईक व ओमकार प्रकाश जाधव तर तृतीय क्रमांक- अन्नपुर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्कॉलर्स हिंगोलीच्या ईश्वर विष्णू धबडगे व ओमकार रंगनाथ रांखोडे यांनी मिळवला. पोस्टर मेंकीग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लेट माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणाची रिधीमा धिरज देशमुख व श्वेता व्यंकट बुजारे यांनी मिळवला तर द्वितीय क्रमाक रायझन इंग्लिश स्कूल, शिरड शोर्य संभाजी साखरे यांनी मिळवला आणि तृतीय क्रमांक ए.बी.एम. इंग्लिश हायस्कुल किशन गजानन शिंगारे यांनी मिळवला.

क्वीज स्पर्धेमध्ये प्रथम क्रमाक इश्वर विष्णु धबडगे व ओमकार रंगनाथ राखोंडे, अन्नपुर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्कॉलर्स यांनी मिळवला तर द्वितीय क्रमांक सुशांत विकास जावळे व राधिका धंनजय गावंडे, युनिवर्सल इंग्लिश स्कुल, वसमत यांनी मिळवला आणि तृतीय क्रमांक हर्ष राजेष अग्रवाल व ओम सतीश सोमाणी, ए.बी.एम. इंग्लिश हायस्कूल, हिंगोली यांनी मिळवला. सूत्रसंचालन सय्यद अनिस व अश्लेषा जोगदंड यांनी केले तर आभार अंजिक्य बांगर यांनी मानले.

Web Title: Response to District Level Science Exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.