राष्ट्रीय विराट लोकमंचच्या शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:55+5:302021-01-03T04:29:55+5:30
हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंचकडून घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व उपचार शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५,०२३ रुग्णांची ...
हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंचकडून घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व उपचार शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५,०२३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले तर अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष लक्ष्मण बांगर, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार बजोरिया, माजी आमदार भाऊराव पाटील, गजानन घुगे, रामराव वडकुते. जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे, मनोज आखरे, शेख निहाल, राम कदम, शेख शकील शेख खलील, सय्यद जावेद राज, मुजीब कुरेशी, अब्दुल माबुद वागबान, शे. नईम शेख लाल, डॉ. आरीफ तडमोड (सोलापूर), प्राहमाजी सरदार तडमोड आदी उपस्थित होते.
यावेळी कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. डॉक्टरांचे व मान्यवरांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल, शेख नोमान नवेद, तोफोक अहेमद खान, शेख नफौस पहेलवान, साजीद लाला, रवी जैस्वाल, सागर जैस्वाल, प्रा. फिरोज पठाण, शेख आवेज. मो. तुफेल बागबान व सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा ५,०२३ लोकांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये मोफत तपासणीसह आवश्यक औषधेही उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या २५० रुग्णांची लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी राष्ट्रीय विराट लोकमंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.