महसूलच्या पथकाने दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:35 AM2019-01-04T00:35:23+5:302019-01-04T00:35:49+5:30
पूर्णा नदीपात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळूची उपसा करून घेऊन जात असणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे पकडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : पूर्णा नदीपात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळूची उपसा करून घेऊन जात असणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी पहाटे पकडले आहेत.
नालेगाव ते जवळा बाजार रस्त्यावर पूर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना मिळाली होती. त्यांनी कारवाई करणारे पथक व्ही. व्ही. मुंढे, प्रल्हाद चट्टे, शेळके, सोमटकर, रेनगडे, अंभोरे, रोडगे, भुसावळे यांना पाठविले होते.
पथकाला अवैधरीत्या वाळू घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर हाती लागले. पथकाने दोन्ही वाहने जप्त करून जवळा बाजार पोलीस ठाण्यात लावली आहेत. त्यांच्याविरूद्ध महसूल अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकातर्फे देण्यात आली.