स्वच्छतेच्या कामांचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:57+5:302021-06-11T04:20:57+5:30
हिंगोली : पावसाळ्याचे दिवस पाहता शहरातील मुख्य भागात जाऊन मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला. १० जून रोजी सकाळपासूनच शहरात ढगाळ ...
हिंगोली : पावसाळ्याचे दिवस पाहता शहरातील मुख्य भागात जाऊन मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला.
१० जून रोजी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान चांगला पाऊस झाला. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी शहरातील खुराणा पेट्रोल पंप, अंबिका टॉकीज परिसर, पेन्शनपुरा, आदी भागात स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. याचबरोबर मोठ्या नाल्यांचीही पाहणी केली. जुन्या शहरात जाऊन तेथील नाल्यांची पाहणी करून ज्या नाल्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत, त्या लवकरच स्वच्छ करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधितांना दिल्या. पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेली स्वच्छतेची कामे येत्या दोन दिवसांत पूर्ण होतील, असेही यावेळी स्वच्छता निरीक्षक बांगर यांनी सांगितले.
पावसामुळे निर्माण झाला गारवा
गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चांगला पाऊस झाला. या पावसामुळे एकदम वातावरण बदलून गेले. रिमझिम व भुरभुर सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात बदलून गेले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.