मोबाईल चोरटे पकडणाऱ्या पथकाला बक्षीस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:24+5:302021-04-28T04:32:24+5:30
हिंगोली : मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पकडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रिवार्ड देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी ...
हिंगोली : मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पकडणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रिवार्ड देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत २७ एप्रिल रोजी सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोनि. उदय खंडेराय, पो.उप.नि. के.डी. पोटे, शिवसांब घेवारे आदींची उपस्थिती होती. यावेळी कलासागर म्हणाले, मोबाईल चोरीच्या घटनेतील चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश केला. त्यातील एका आरोपीकडून ३ लाख ८९ हजारांचे ३३ मोबाईल जप्त केले. त्यामुळे मोबाईल चोरीच्या घटनेवर आळा बसणार आहे. यातील फरार आरोपीला ही लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. चोरट्यांना पकडणाऱ्या पथकातील स्थागुशाचे पो.उप.नि. के.डी. पोटे, एस.एस. घेवारे, सपोउपनि. बालाजी बोके, पोह विलास सोनवणे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, पोना. विशाल घोळवे, राजू ठाकूर, पोशि ज्ञानेश्वर साळवे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळै, ज्ञानेश्वर पायघन, सायबर सेलचे जयप्रकाश झाडे, सुमित टाले, चालक पोना शेख जावेद यांना बक्षीस देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कमी भावात विकत होते मोबाईल
यावेळी कलासागर म्हणाले, चोरटे परिसरातील गावामध्ये मोबाईल विक्री करीत होते. आतापर्यंत त्यांनी भेंडेगाव, धामणगाव, चोंढी, शिरड शहापूर, म्हातारगाव आदी गावात मोबाईल विकल्याचे त्यांनी सांगितले.