५३ क्विंटल तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:02 AM2017-12-21T00:02:32+5:302017-12-21T00:04:03+5:30

येथील शांताबाई मुंजाजी दराडे विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहाराचा ११८ कट्टे तांदूळ काळ्या बाजारात नेताना हिंगोली शहर पोलिसांनी पकडून ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Rice gains 53 quintals | ५३ क्विंटल तांदूळ पकडला

५३ क्विंटल तांदूळ पकडला

Next
ठळक मुद्देशालेय पोषण आहाराचा माल : मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील शांताबाई मुंजाजी दराडे विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहाराचा ११८ कट्टे तांदूळ काळ्या बाजारात नेताना हिंगोली शहर पोलिसांनी पकडून ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शहरातील औंढा टी पॉर्इंट येथे पोलीस कर्मचारी सुनील अंभोरे, सुनील जयस्वाल, वसीयोद्दीन आदींनी रात्री एकच्या सुमारास टेम्पो क्र. एमएच-२६- एच- ६५९0 हा अडविला. आज सकाळी हा टेम्पो कंत्राटदारच परस्पर लांबवित असल्याची आवई उठली होती. मात्र तपासात हा माल शांताबाई मुंजाजी दराडे विद्यामंदिर शाळेचा असल्याचे समजल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून टेम्पोचालक संजय ध्रुपत खिल्लारे, शिवाजी परबतराव ढाले व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक गडदे यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला.
या टेम्पोतील मालाची पाहणी करण्यासाठी आधी पुरवठा विभागाचे पथकही आले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास मालाची मोजणी सुरू झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक मैराळ, पोना दंडगे, अस्लम, शेख शकील, उमेश जाधव, मुजीबुल रहेमान आदींची उपस्थिती होती. हा तांदूळ ५३ क्ंिवटल ७८ किलो एवढा भरला. त्याची किंमत १.४१ लाख एवढी होते. तर टेम्पोची किंमत ५.४0 लाख एवढी आहे. हा एकूण ६.८१ लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. अनेक शाळांत शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिजतच नाही. त्यामुळे पोलिसांची वक्रदृष्टी अशांना महागात पडू शकते.

Web Title: Rice gains 53 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.