ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा धोका वाढला; दुसऱ्या लाटेत तब्बल ११५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:29 AM2021-04-24T04:29:53+5:302021-04-24T04:29:53+5:30
ऑक्सीजनसाठी करावा लागतोय ८० किमीचा प्रवास सध्या ऑक्सीजनचा बेड मिळणे अवघड झाले आहे. यासाठी तब्बल ८० किमीचा प्रवास करून ...
ऑक्सीजनसाठी करावा लागतोय ८० किमीचा प्रवास
सध्या ऑक्सीजनचा बेड मिळणे अवघड झाले आहे. यासाठी तब्बल ८० किमीचा प्रवास करून रुग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याचे दिसत आहे. वसमत तालुक्यातील गिरगावचे रुग्ण सिद्धेश्वर, कळमनुरी, कवठा येथे दाखल करावे लागले. तर वरखेड्याचे रुग्णही कळमनुरीला हलविण्याची वेळ आली होती. जेथे बेड उपलब्ध असतील तेथे जाण्यात एवढा मोठा फेरा पूर्ण करावा लागत आहे.
वेळेवर उपचाराअभावी मृत्यू
ग्रामीण भागात अनेकजण अजूनही कोरोनाबाबत गंभीर नाहीत. अंगावरच आजार काढून शेवटी उपचाराअभावी प्राण सोडत आहेत. वृद्धांमध्ये यामुळे मृतांचे प्रमाण वाढले आहे. कधी आजार जडला हेही कळत नसल्याने हे प्रकार घडत आहेत. जेथे रुग्ण आहेत, अशा गावांत नियमितपेक्षा जास्त मृत्यू होत असून हे शेकडोंचे मृत्यू कुठेच नोंदलेही जात नाहीत.
ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित
आता ग्रामीण भागात जेथे जास्त रुग्ण आढळत आहेत. अशा ठिकाणी तपासणी कॅम्प लावत आहोत. अँटीजन चाचणी करून रुग्ण शोधले जात आहेत. शिवाय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतच आता ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले आहे. लवकरच ते अस्तित्वात येतील.
डॉ.शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यात मृत्यूचे तांडव
हिंगोली ५८
वसमत ४०
कळमनुरी ४७
औंढा १८
सेनगाव १२
ऑक्सीजन बेडची मारामार
तालुका कोविड हॉस्पिटल ऑक्सीजन बेडस भरलेले बेड
हिंगोली ४ ३४५ ३०१
सेनगाव १ ३५ ३५
औंढा १ ४० ४०
कळमनुरी १ १०० १५८
वसमत १ ५० ६४
जिल्ह्यात आजघडीला केवळ ८ ऑक्सीजन बेड शिल्लक आहेत. तर हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव व औंढा येथे साधे एकूण १८३४ बेड असून त्यापैकी ८३४ बेड भरलेले आहेत. तर १००० बेड शिल्लक आहेत.