रस्त्याची दुर्दशा वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:00+5:302020-12-23T04:26:00+5:30
नालीचे बांधकाम नाही पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे नवीन वसाहत ठिकाणी नालीचे बांधाकाम करण्यात आलेले नाही. यामुळे या ...
नालीचे बांधकाम नाही
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे नवीन वसाहत ठिकाणी नालीचे बांधाकाम करण्यात आलेले नाही. यामुळे या भागातील नागरिकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर साचत असून मोठी घाण याठिकाणी होत आहे. अनेक दिवसांपासून नवीन वसाहतीतील नागरिक नालीचे बांधकाम करण्याची मागणी करीत आहे. पण आतापर्यंत या भागात नालीचे काम करण्यात न आल्यामुळे सर्व सांडपाणी या भागातील रस्त्यावर जमा होत आहे. अनेक दिवसांपासून पाणी साचत असल्याने याठिकाणी दुर्गंधही पसरत आहे.
एमआयडीसी चौकातील रस्त्यांची दुरावस्था
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावालगत असलेल्या एमआयडीसी भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. याठिकाणी नेहमी अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांवर खड्डे पडले आहे. एमआयडीसी भागातील प्रत्येक चौकामध्ये असलेले रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते लवकरात लवकर दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
गावात येण्यासाठी रस्ता नाही
बोल्डा : कळमनुरी तालुक्यातील बोल्डा गावाजवळ असणाऱ्या सिंदगी - जांब दरम्यान रस्ता नाही. या रस्त्यावरच बोल्डा गाव येत असल्यामुळे गावात येण्यासाठी रस्ता नसल्याने वाहनधारकांसह गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. गावात येण्यासाठी रस्ता करण्यात यावा अशी मागणी गावातून अनेकदा राजकीय पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पण आतापर्यंत गावात येण्यासाठी रस्ता करण्यात आला नाही. अनेक वाहनधारकांना गावात येताना आपले वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.