रस्ता सुरक्षा अभियान; आज उद्घाटन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:54 AM2019-02-04T00:54:06+5:302019-02-04T00:54:32+5:30
उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०१९ राबविण्यात येणार आहे. सदरील अभियानाचे उदघाटन शहरातील इंदिरा गांधी चौक येथील वाहतूक शाखा कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : उप प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०१९ राबविण्यात येणार आहे. सदरील अभियानाचे उदघाटन शहरातील इंदिरा गांधी चौक येथील वाहतूक शाखा कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहेत. वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा यासाठी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, विभाग नियंत्रक रा. प. जालिंधर सिरसाट, डॉ. राजेंद्र पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, पोनि अंगद सुडके यांनी केले आहे.