रस्त्यावर पाणी साचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:34 AM2021-01-16T04:34:35+5:302021-01-16T04:34:35+5:30
शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर हिंगोली : शासनाकडून बंदी असलेल्या कापडी थैल्यांचा अद्यापही शहरातील दुकानांमध्ये सर्रास वापर होत आहे. अनेकदा ...
शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर
हिंगोली : शासनाकडून बंदी असलेल्या कापडी थैल्यांचा अद्यापही शहरातील दुकानांमध्ये सर्रास वापर होत आहे. अनेकदा नगरपालिकेकडून कॅरीबॅगबंदीसाठी मोहीम राबविण्यात आली आहे, तरीही शहरातील बाजारपेठेत कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे होत आहे.
हिंगोली-खांबाळा रस्ता उखडला
हिंगोली : शहरातून खांबाळा गावाकडे जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावरून अनेक रेतीचे ट्रॅक्टर रात्री व सकाळी धावत असल्याने, हा रस्ता खराब झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. मागील सहा महिन्यांत हा रस्ता पूर्ण उखडला गेला असल्याने, वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला
नंदगाव : औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव, अंजनवाडा, सिद्धेश्वर व इतर परिसरातील शेतशिवारात वन्यप्राणी घुसत आहेत. शेतात घुसून पिकांची मोठी नासाडी वन्य प्राणी करीत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. यासाठी या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.