कर्णकर्कश आवाज करणारी वाहने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:26+5:302021-02-15T04:26:26+5:30

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष हिंगोली : शहरातील शाहूनगर व कमलानगर भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मागील पाच वर्षांपासून नगरवासीयांकडून ...

The roaring vehicles grew louder | कर्णकर्कश आवाज करणारी वाहने वाढली

कर्णकर्कश आवाज करणारी वाहने वाढली

googlenewsNext

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

हिंगोली : शहरातील शाहूनगर व कमलानगर भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मागील पाच वर्षांपासून नगरवासीयांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे, पण वारंवार मागणी करूनही कोणीही याकडे लक्ष देत नाही. आता नगरामध्ये मुरुमांचा रस्ता असून, या रस्त्यात मोठाले खड्डे पडले आहे. चार दिवसआड करून येणारे नळयोजनेचे पाणी या खड्ड्यात साचत असून, वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करताना मोठा त्रास होत आहे.

हळदीवर करपा रोगाची लागण

औंढा नागनाथ : तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. अनेक ठिकाणी हळद पिकाला पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने हे पीक बहरले आहे, पण मागील सहा ते आठ दिवसांपासून अचानक या पिकाची पाने पिवळे पडून करपून जात आहेत. सध्या या पिकावर करपा रोगाची लागण असल्याची शेतकऱ्यांत चर्चिले जात आहे.

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : तालुक्यात रोजगार हमी योजनेचे काम बंद आहे. यामुळे मजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे मजूर वर्ग कामाच्या शोधात भटकंती करीत आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यावर मजुरांचे ट्रॅक्टर, ट्रकद्वारे जमाव कामाच्या शोधार्थ परगावी जात असल्याचे दिसत आहे. सध्या शासनाकडून शाळा सुरू करण्याचे आदेश असून, मजूर वर्ग आपल्या लेकरांसोबत परगावी स्थलांतर करीत असून, या बालकांचे शिक्षण अडचणीत येत आहे.

शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावाच्या शेतशिवारातील वीजपुरवठा महावितरणकडून थकीत वीजदेयकांमुळे खंडित करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून शेतशिवारात वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पीक वाळत असून, शेतकऱ्यांंची चिंता वाढली आहे. यासाठी शासनाने काही उपाययोजना करून वीजपुरवठा सुरू करावा, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

गावात भीषण पाणीटंचाई

हिंगोली : तालुक्यातील अंभेरी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नळयोजना मागील वर्षभरापासून बंद आहे. यामुळे गावकऱ्यांचे पाणी विहीर, हातपंप, बोअर यावर अवलंबून आहे, पण आता गावातील पाण्याचे स्रोत आटत असून, गावकऱ्यांना पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे. अनेक गावकरी दिवसा पाणी मिळत नसल्यामुळे रात्री उशिरा दूरवर पायपीट करीत पाणी भरत आहेत. यासाठी शासनाने लक्ष देऊन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

स्वच्छता मोहिमेची मागणी

सेनगाव : शहरातील बस स्थानक परिसरामध्ये अनेक पानटपऱ्यांसह फळविक्रेत्यांचे गाडे आहे. यामुळे बस स्थानक परिसरामध्ये गुटखा पुड्या, पाणी पाउच, पाण्याचे निकाम्या बॉटल, अनेक फळांच्या साली टाकण्यात येत आहेत. यामुळे बस स्थानकात बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवासी वर्गांना मोठा त्रास होत आहे. या कचऱ्यामुळे बस स्थानक परिसरात दुर्गंधीमय वातावरण पसरलेले असून, यासाठी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होते.

स्वच्छता गृहाची दुरवस्था

हिंगोली : शहरातील न्यायालयात असणाऱ्या स्वच्छतागृहात मोठी घाण पसरली आहे. याचबरोबर, या स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झालेली आहे. सदैव दुर्गंधीमय असणाऱ्या स्वच्छतागृहाचा वापर न करता, न्यायालयातील कर्मचारी व इतर न्यायालयाच्या इतर परिसरात लघुशंकेला बसत आहेत. यामुळे या स्वच्छतागृहाची स्वच्छता करून, हे गृह दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी न्यायालय परिसरातून होत आहे.

पाणपोई उभारण्याची मागणी

हिंगोली : शहरात अनेक भागांतील नागरिक कामानिमित्त येत आहेत, पण उन्हाची तीव्रता वाढली आहे. यासाठी नागरिकांना पाणी पिण्यासाठी शहरातील हॉटेल, दुकानावरून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना विकतचे पाणी पिणे अवघड असल्यामुळे शहरात पाणपोई उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार

हिंगोली : शहरातील गांधी चौक, नांदेड नाका या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ सुरू असते, पण या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्यामुळे, रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दुचाकीस्वारांचा या जनावरांमुळे अपघातही झालेला आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.

Web Title: The roaring vehicles grew louder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.