नर्सी येथे विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:25 AM2021-01-15T04:25:02+5:302021-01-15T04:25:02+5:30
नर्सी येथील जि. प. प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गाला मागील पंधरा दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. मात्र येथील एका शिक्षकाचा ...
नर्सी येथील जि. प. प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गाला मागील पंधरा दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. मात्र येथील एका शिक्षकाचा काेराेना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांची बुधवारी तपासणी केली. या सर्व शिक्षकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर गुरुवारी शाळेतील ११३ विद्यार्थ्यांपैकी ६४ जणांची तपासणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करून सर्वांचे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. अलोक गट्टू यांनी सांगितले. तर उर्वरित ४९ विद्यार्थ्यांची सुद्धा लवकरच तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी दीपक ईढोळे, सुनील उन्हाळे, राहुल इंगोले, डॉ. मनीषा कऱ्हाळे, विजय जोजारे, विजय वाकडे, आठवले, मोठे, बांगर, श्रीरामे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. फाेटाे नं. १७