रूचेश जयवंशी नवे जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:01 AM2018-11-14T01:01:20+5:302018-11-14T01:01:46+5:30
येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हाधिकारी भंडारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बदलीने येथे आले होते. मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कृषी यांत्रिकीकरण, लिगो प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन, राष्टÑीय महामार्ग, रेल्वे महामार्गासाठी लागणाºया जमिनीचे भूसंपादन याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
जलसिंचन प्रकल्पांसह जलयुक्तच्या कामावरही त्यांनी जातीने लक्ष घालून अधिकाºयांना कामाला लावण्याचा प्रयत्न केला होता. पुढाºयांशी झालेल्या वादातून ते हिंगोलीत बदलीवर आले होते. येथे मात्र त्यांनी कृषी विषयक कामांमध्येच गुंतवून घेतले होते. आता त्यांची बदलीही बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कृषी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून भंडारी हे बदलीसाठी प्रयत्नशिल होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची बदली निश्चित मानली जात होती. नव्याने येथे अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी हे येत आहेत.