तुरीचे १६ कोटी ९७ लाखांचे चुकारे लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:32 AM2018-04-03T00:32:19+5:302018-04-03T16:34:03+5:30
दरवर्षी नाफेड केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या चुका-याची प्रतीक्षा करण्याची वेळ कायम आहे. आता तर चक्क १६ कोटी ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयाचे चुकारे लटकलेले असल्याने शेतक-यांची यंदाही चुका-यासाठी गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दरवर्षी नाफेड केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या चुका-याची प्रतीक्षा करण्याची वेळ कायम आहे. आता तर चक्क १६ कोटी ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयाचे चुकारे लटकलेले असल्याने शेतकºयांची यंदाही चुका-यासाठी गैरसोय होत आहे.
नाफेडच्या खरेदी केंद्रावर अनेक वर्षापासून तूर विक्री केल्याचे चुकारे उशिराने मिळत असल्याचीच भावना शेतकºयांना होऊन बसली आहे. एक तर या ठिकाणी तूर विक्रीस आल्यानंतर नाफेडच्या नियमानुसार खरेदी होत असून, कधी कधी तर दहा ते बारा किलोही तुरी शेतकºयांना वापस न्यावा लागतात. मात्र उशिरा का होईना; तुरीला हमी भाव मिळत असल्याने शेतकरी या ठिकाणी तुरी विक्रीसाठी घेऊन येतात. दोन वर्षापासून काही प्रमाणात पर्जन्यमान योग्य असल्याने शेतकºयांना तुरी किलोऐवजी क्विंटलात होत आहेत. मात्र उशिरा का होईना हमी भावाप्रमाणे तूर खरेदीचे चुकारे मिळत असल्याने शेतकरी यात समाधानी आहेत. अद्याप पर्यंत नाफेडच्या गोदामामध्ये जिल्ह्यातील पाचही केंद्रावर ३७ हजार ७३०.३३ क्विंटल तूर गेली आहे. यातील काही शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्णत्वास गेली असून, त्या-त्या शेतकºयाच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे कीचकट झाली. परंतु यावरही तोडगा काढून शेतकºयांना तूरीचे चुकारे देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कापुरे यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसांत उर्वरित शेतकºयांनाही चुकारे मिळण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १९०० कोटी रुपयाची मागणी केली आहे. त्यानुसार महाराष्टÑासाठी ६०० कोटी मंजूर झाले आहेत व येत्या पंधरा दिवसाच्या आत शेतकºयांच्या खात्यावर तुरीचे चुकारे पडतील असे मुख्यमंत्र्याने सांगितले आहे. तशी तूर विक्री केलेल्या शेतकºयांच्या कागदपत्राची तपासणी करणे सुरु आहे. अद्यापपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकºयांना ८६ लाख ५३ हजार ५८० रुपये वाटप झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक एम. डी. कापुरे यांनी सांगितले. तर अजूनही शेतकºयांना चुकारे वाटप करणे सुरुच असल्याचे ते सांगत होते.