वाळूचे ट्रॅक्टर उलटले; मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:18 AM2019-04-10T00:18:09+5:302019-04-10T00:18:21+5:30
हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर ९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर उलटल्याने एका मजुराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर ९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ट्रॅक्टर उलटल्याने एका मजुराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
टॅक्टर क्र. एमएच ३८ व्ही १३३० हे वाळू घेवून माळेगावकडे येत होते. लक्ष्मण तुकाराम वानोळे (२०, रा. घोळवा) हा ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये बसला होता. घोळवा पाटीजवळ ट्रॅक्टर उलटले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून लक्ष्मण वानोळे हा जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच फौजदार श्रीराम जामगे, पोहेका सय्यद अली यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान प्रशासनाची नजर चुकवत येथील परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.