सावित्रीबाई फुले ठरल्या महिलांची जीवनरेखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:30+5:302021-01-03T04:30:30+5:30
महिला सुशिक्षित झाल्यामुळे २१ व्या शतकात विविध क्षेत्रांमध्ये त्या उत्तुंग भरारी घेत आहेत. हिंगोलीसारख्या छोट्याशा जिल्ह्यात १०८ या रुग्णवाहिकेद्वारे ...
महिला सुशिक्षित झाल्यामुळे २१ व्या शतकात विविध क्षेत्रांमध्ये त्या उत्तुंग भरारी घेत आहेत. हिंगोलीसारख्या छोट्याशा जिल्ह्यात १०८ या रुग्णवाहिकेद्वारे लोकांचे प्राण वाचविणाऱ्या १०८ च्या हिंगोली जिल्हा आपतकालीन वैद्यकीय समन्वयिका कल्पना लहाडे यांचे कार्य महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. उच्च शिक्षण घेऊन १०८ रुग्णवाहिकेचे काम आज त्या नेटाने करीत आहेत.
मार्च महिन्यापासून कोरोना आजाराचा संसर्ग वाढलेला आहे. या काळातही कोरोनाची भीती न बाळगता खंबीरपणे जबाबदारी पेलवत कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. १२ रुग्णवाहिका, २ चालक, ३ डॉक्टर यांना बरोबर घेऊन रुग्णवाहिकेद्वारे रुग्ण पाठविण्याचे कार्य त्या स्वत: लक्ष देऊन पूर्ण करतात. हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांच्या जवळपास असून रात्री-बेरात्री रुग्णांच्या नातेवाइकांचा कॉल आल्यास स्वत:च्या कर्तव्याची जाण ठेवून अविरत कार्य करत असून याचे श्रेय त्या सावित्रीबाई फुले यांना देतात. याचबरोबर १०२ रुग्णवाहिकेद्वारे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत माता व बाळांची काळजी घेतात. १०२ रुग्णवाहिकेद्वारे हे कार्य त्या २०११ पासून अविरतपणे करत आहेत.
सद्य:स्थितीत महिलांना शैक्षणिक क्षेत्रात ३० टक्के आरक्षण आहे. महिलांचे शैक्षणिक प्रमाण वाढल्यामुळे स्त्री- पुरुष समानता तत्त्वानुसार शैक्षणिक आरक्षण ३० टक्क्यांवरून ५० टक्के होणे गरजेचे आहे.