सावित्रीबाई, फुले जयंतीनिमित्त औंढा नगरीत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:19+5:302021-01-08T05:38:19+5:30
या कार्यक्रमाचे उद्घाटन बाल प्रकल्प अधिकारी नयना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉ. तृप्ती गजानन वाशिमकर, प्रमुख पाहुणे ...
या कार्यक्रमाचे उद्घाटन बाल प्रकल्प अधिकारी नयना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉ. तृप्ती गजानन वाशिमकर, प्रमुख पाहुणे डॉ. सीमा अभय देशपांडे व मंजूषा जाधव यांची उपस्थिती होती. प्रारंभी
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी वैद्यकीय क्षेत्र डॉ. तृप्ती वाशिमकर, क्रीडा क्षेत्र कुमारी कशीश गिरी, समाजकार्य ज्योती देशपांडे, वकील क्षेत्र ॲड. दीपाली पठाडे, शिक्षण क्षेत्र द्वारकाताई चव्हाण शिक्षिका या महिलांचा सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. तृप्ती वाशिमकर व डॉ. सीमा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन्मान सावित्रीच्या लेकीचा या कार्यक्रमाप्रसंगी पूजा गोरे, स्वाती जाधव, यशोदा शिंदे, कशिश गिरी, राधिका चिंचोलीकर, स्वाती वाखरकर, ज्योती धुळे, रूपाली रासेकर, वंदना वंजे, ज्योती राऊत, सीमा गरुड, स्वाती चव्हाण, राधा काळे, यशोदा शिंदे, डांगेताई, स्वाती जाधव, उमा गिरी आदी महिला या कार्यक्रमाप्रसंगी हजर होत्या. या कार्यक्रमासाठी सुनीता गोबाडे, पूजा गोरे, स्वाती जाधव, यशोदा शिंदे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन सावता परिषद जिल्हाध्यक्षा सुनीता गोबाडे यांनी केले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सुनीता गोबाडे सूत्रसंचालन स्वाती जाधव तर आभार प्रदर्शन यशोदा शिंदे हिने मानले.
फोटो नंबर ६