पुन्हा सुरू झाले महसूल दस्त स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:32 AM2018-11-18T00:32:06+5:302018-11-18T00:32:54+5:30

महसूल विभागाच्या जमीनविषयक महत्त्वपूर्ण दस्तावेजांच्या स्कॅनिंगचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले असून मागील आठ दिवसांत दोन लाखांवर दस्तांचे स्कॅनिंग झाले आहे.

 Scanning the resumed revenue scanning | पुन्हा सुरू झाले महसूल दस्त स्कॅनिंग

पुन्हा सुरू झाले महसूल दस्त स्कॅनिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महसूल विभागाच्या जमीनविषयक महत्त्वपूर्ण दस्तावेजांच्या स्कॅनिंगचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले असून मागील आठ दिवसांत दोन लाखांवर दस्तांचे स्कॅनिंग झाले आहे.
मागील दोन वर्षांपासून हे काम ठप्प पडले होते. सातबारा संगणकीकरणानंतर बदलून गेलेले जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी हा स्कॅनिंगचा मुद्दा हाती घेतला होता. त्यामुळे संबंधित कंत्राट घेणाऱ्यास मुदतवाढ देवून कामाला लावले होते. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाचे मिळून ३७.७0 लाख दस्त स्कॅनिंग करून घेण्याचे नियोजन होते. मात्र १२ लाखांच्या आसपास दस्त स्कॅन झाल्यानंतर हे काम बंद पडले होते. त्यामुळे पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी मोठी दमछाक झाली. प्रशासनाने वारंवार नोटिसा देवूनही संबंधित कंत्राटदार बधत नव्हता. महाभूमिअभिलेख विभागाकडूनही यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आता हे काम सुरू झाले व त्याला गतीही आली आहे.
यात हिंगोली तालुक्याच्या ७.४३ पैकी ४.३२ लाख, सेनगाव तालुक्याचे ४.९८ पैकी २.0७ लाख, कळमनुरी तालुक्याचे ९.६७ पैकी ३.८३ लाख, औंढा तालुक्याचे ५.७0 पैकी २.२१ लाख, वसमत तालुक्याचे ९.९0 पैकी १.९४ लाख दस्तांचे स्कॅनिंग करण्यात आले. हे स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर जिर्ण कागदपत्रांचे कायमस्वरुपी डिजिटायझेशन होणार आहे. त्याचा प्रशासनाला माहितीसाठीही मोठा उपयोग होणार असून एका क्लिकवर माहिती मिळणार आहे.

Web Title:  Scanning the resumed revenue scanning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.