शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया आॅफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:29 PM2018-08-31T23:29:30+5:302018-08-31T23:30:00+5:30

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा याला कारणीभूत आहे.

 Scholarship Application Process Offline | शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया आॅफलाईन

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया आॅफलाईन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा याला कारणीभूत आहे. त्यामुळे गतवर्षीपासून आॅफलाईनद्वारेच अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे गतवर्षीपासून शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून खबदारी घेतली जात आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर आॅनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना शासनाकडून यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. परंतु पोर्टलमधील वारंवार बिघाडामुळे आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. आॅफलाईन पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांची माहिती भरताना वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा यामुळे विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली. परंतु आता शिष्यवृत्तीसाठी आॅफलाईन पद्धतीने माहिती स्वीकारली जाणार आहे.
जबाबदार : कार्यशाळेस उपस्थिती बंधनकारक
२०१८-१९ या वषार्तील शिष्यवृत्ती करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस उपस्थित राहणे बंधनकार आहे. विद्यार्थी वंचित राहिल्यास मुख्याध्यापक जबाबदार राहतील.
अशा सूचनाही परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. औंढा पंचायत समिती १० सप्टेंबर, सेनगाव पं. स. ११ सप्टेंबर, वसमत पं. स. १२ सप्टेंबर, कळमनुरी पं.स. १४ सप्टेंबर तर हिंगोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कार्यशाळा होणार आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, भारत सरकार मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाºया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

Web Title:  Scholarship Application Process Offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.