सावित्रीच्या लेकींना शिष्यवृत्तीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:14 AM2018-10-02T01:14:11+5:302018-10-02T01:14:29+5:30
जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागील दोन वर्षांत २१ हजार २६८ आठवी ते दहावी, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर चालू शैक्षिण वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागील दोन वर्षांत २१ हजार २६८ आठवी ते दहावी, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर चालू शैक्षिण वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश समोर ठेवत जि. प. समाजकल्याणकडून मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसाह्य केले जाते. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, अनुदानित-विनाअनुदानित व मान्यताप्राप्त शाळांतील २१२६८ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसाह्य करून त्यांना आधार दिला जातो. दुर्बल घटकांतील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तसेच पालकांनीही त्यांना नियमित शाळेत पाठवावे, हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजनेतंर्गत २१ हजार २६८ मुलींना लाभ दिला. ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थिनींना वार्षिक प्रत्येकी ६०० रूपये तर आठवी ते दहावी वार्षिक १ हजार रुपये याप्रमाणे सदर रक्कम मुलींच्या खात्यावर जमा केली आहे. याबाबतची माहिती जि. प. समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांचे पाल्य २६१, मेट्रिकपूर्वचे ७६ तर इतर २७०७ विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आल्याची माहिती विभागाने दिली. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या याद्या वेळेत सादर कराव्या लागतील.
महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे गतवर्षीपासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याणकडून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा भरवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आॅफलाईन प्रस्ताव कसा सादर करावा, यासह विविध माहिती दिली. ५ नोव्हेंबर पर्यंत पात्र विद्यार्थ्यांची कार्यालयात आणुन देण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.