कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:22 AM2018-03-22T00:22:12+5:302018-03-22T00:22:12+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबियांच्या पाल्यांसाठी ३.५५ लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती केंद्र संचालक व्ही.एन. साखरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबियांच्या पाल्यांसाठी ३.५५ लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती केंद्र संचालक व्ही.एन. साखरे यांनी दिली.
मुंबई गिरणी कामगार अधिनियमांतर्गत कामगार कल्याण निधीची वर्गणी भरणाऱ्या पालकाच्या किमान ६0 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणाºया पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यात विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. यात राज्य परिवहन आगार, वीज कंपनी, बँका, साखर कारखाने, सूतगिरणी, आयुर्विमा, कापूस पणन, महाबीज, महानंद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, खाजगी कंपन्या, खाजगी प्राधिकरण, चर्मोद्योग महामंडळ आदी आस्थापनांमध्ये काम करणाºया पाल्यांना याचा लाभ घेता येतो, असे सांगण्यात आले.
ज्यांनी हिंगोली केंद्रातून अर्ज भरले अशांनी आपल्या नावाची खात्री करून घ्यावी. शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, असे साखरे यांनी कळविले.