‘आरटीई’ अंतर्गत शाळा नोंदणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:18 AM2018-01-23T00:18:05+5:302018-01-23T00:18:09+5:30
आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी इंग्रजी शाळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकार आहे. संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना त्यांच्या तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २२ जानेवारीपासून आॅनलाईन शाळा नोंदणीस सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी इंग्रजी शाळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकार आहे. संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना त्यांच्या तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २२ जानेवारीपासून आॅनलाईन शाळा नोंदणीस सुरूवात झाली आहे.
वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जिल्ह्यात खासगी माध्यमांच्या ८१ इंग्रजी शाळा आहेत. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील मुलांच्या मोफत शिक्षणासाठी हा उपक्रम राबविला जातो. त्यामुळे या शाळांना नोंदणी करणे आवश्यक आहे. संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांनी शाळांची आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. २२ ते ३० जानेवारी दरम्यान शाळा नोंदणी करण्याची तारीख ठरवून देण्यात आली आहे. गतवर्षी आरटीई २५ टक्केच्या जिल्ह्याला ५१२ जागा मिळाल्या होत्या. या जागांसाठी २८३ पालकांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी १७३ मुलांना शाळेत प्रवेश मिळाला होता. अशी माहिती सर्व शिक्षा अभियानकडून देण्यात आली. संबधित पात्र शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
...तर शाळा रद्दचा प्रस्ताव पाठविला जाणार
आरटीई २५ टक्के अंतर्गत दुर्बल घटकांतील मुलांच्या मोफत शिक्षणासाठी शाळांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु ज्या शाळांना नोंदणी करण्यास टाळाटाळ केली, त्या शाळेचा शाळा रद्दचा प्रस्ताव शिक्षण संचालकाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली. याबाबत सर्व तालुक्यांच्या गशिअ यांनाही कळविण्यात आले आहे. त्यामुळे संबधित पात्र शाळांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
४बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार वंचित, दुर्बल घटकांतील व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के प्रवेशासाठी मोफत प्रवेश २०१८-१९ साठी प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणुक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोनबिल, घटपट्टी, वाहनपरवाना, उत्पन्नाचा दाखला १ लाखांपेक्षा कमी, जन्मदाखला इत्यादी कागदपत्रे आहेत. एससी, एसटी आणि बीपीएल कार्डधारकांसाठी उपक्रम राबविला जातो.