पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार; मुलांना शाळेत पाठवण्यास धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:22+5:302021-01-18T04:27:22+5:30
हिंगोली जिल्ह्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी आधी सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ...
हिंगोली जिल्ह्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी आधी सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात जवळपास ८५ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा नर्सी येथे शाळा सुरू झाल्यावर एक शिक्षक बाधित आढळला होता. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची तपासणी केली. नववी ते बारावीचे विद्यार्थी जास्त समजदार असतात. त्यामुळे पालकांमध्ये तेवढी चिंता नव्हती. मात्र आता पाचवीपासूनच्या मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने अनेकांना धाकधूक लागली आहे, तर काही मात्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करीत असून, यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे सांगत आहेत. याबाबत शिक्षण विभागानेही आदेश काढण्याची तयारी सुरू केली असून, सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास २,८०० शिक्षक लागणार आहेत. यापूर्वीच जिल्ह्यात शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आहे.
नववी ते बारावीची उपस्थिती किती ?
हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीची उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून होती. अनेक पालकांनी शाळा सुरू करताना संमती दर्शविली असली तरीही नंतर मुलांना शाळेत पाठविले नाही. अजूनही कोरोनाची भीती मनातून गेली नाही. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवित नसल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात आठ ते दहा हजार विद्यार्थीच शाळेत हजर राहत आहेत. त्यामुळे ही उपस्थिती वाढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातील उपस्थिती सर्वांत कमी असल्याची नोंद आढळून आली आहे. त्यात आता नवीन वर्ग सुरू होत आहेत.