जलयुक्तवरून अधिका-यांना कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:53 PM2017-12-12T23:53:03+5:302017-12-12T23:53:21+5:30
जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची यंत्रणांसह महसूलच्या उपविभागीय अधिका-यांनाही व्यवस्थित माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरत २0 डिसेंबर रोजीच्या बैठकीत इत्थंभूत माहिती असेल तरच या, अशा कानपिचक्या दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची यंत्रणांसह महसूलच्या उपविभागीय अधिका-यांनाही व्यवस्थित माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरत २0 डिसेंबर रोजीच्या बैठकीत इत्थंभूत माहिती असेल तरच या, अशा कानपिचक्या दिल्या.
या बैठकीस जि.प.चे सीईओ एच.पी.तुम्मोड, अति. मुकाअ ए.एम. देशमुख, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, उमाकांत पारधी, बानापुरे, वनाधिकारी केशव वाबळे यांच्यासह कृषी, जलसंधार आदी विभागांचे अधिकारी हजर होते.
जिल्ह्यात कृषी व जलसंधारण विभागाची कामे ज्या पद्धतीने होत आहेत. त्या कामांची जी गती आहे, त्यावरून जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली. तर कृषी विभागाने कामांची गती नसण्यामागे जिल्हा उपनिबंधकांकडून अभियंता, मजूर सोसायट्या व कंत्राटदारांना कामे वाटप करायच्या प्रमाणाचा अहवाल वेळेत दिला जात नसल्याचे सांगितले. त्यावर हे अहवाल वेळेत मिळविणे आपल्याच विभागाचे काम असल्याचे सांगून बैठकीतच संबंधितास बोलावण्याची मागणी केली. त्याला स्पष्ट नकार देत कारणे सांगणे सोडा, असे सांगितले.
तर कृषी अधीक्षक व उपविभागीय अधिकाºयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती विचारली तर त्यांच्या जुन्या व नव्या उत्तरांमध्ये तफावत येत होती. हे अधिकारी संबंधित यंत्रणांच्याच भरवशावर दिसून येत होते. त्यामुळे या अधिकाºयांनीही माहिती ठेवण्यास बजावले.
वसमत तालुक्यातील तर पाचच गावे जलयुक्तमध्ये असताना उपविभागीय अधिकारी बानापुरे यांना माहिती देता आली नाही. तर २0१५-१६ च्या गावांची प्रगती तपासण्यास सांगितले. तसेच २0१७-१८ चे कृती आराखडे सादर करण्यासही आदेशित केले आहे.
कृषी विभागाच्या अधिकाºयांना तर चांगल्याच कानपिचक्या दिल्या. शेतकºयांची कामे करायचे काहीच वाटत नाही केवळ मार्चला तीन टक्के पगार वाढ मिळते की नाही, याकडेच लक्ष असते, अशा शब्दांत फटकारले.
जलसंधारणच्या अधिकाºयांनीही जिल्हा प्रशासनाकडून मंजूर झालेली कामेही सुरूच केली नाहीत. जि.प.ने ही कामे सुरू केली तर जलसंधारणकडे इतर कामांचा भार नसतानाही कामे का सुरू होत नाहीत, याचेच आश्चर्य व्यक्त केले. दोन्ही विभागांना एकच अधीक्षक अभियंता आहेत तर जि.प.च्या निविदा निघतात अन् जलसंधारणच्या निघत नाहीत. त्यामुळे पाठपुरावाच केला जात नसल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.
कडक धोरण : चौकशी करुन कामे बंद
यापूर्वीच चौकशीचे आदेश दिलेल्या कामांपैकी सावा, चोंढी, ब्राह्मणवाडाच्या सीनबीची जलसंचय क्षमता तपासण्यास सांगण्यात आले. तर वरूड चक्रपान, जामठी क्र.-३ व ४, कवठा, बटवाडी क्र.-१, पांगरा शिंदे क्र.१ ही कामे आहे त्या परिस्थितीत अंतिम करण्यास सांगितले आहे.
औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे सीएनबीची दोन कामे १0 एप्रिल २0१७ रोजी प्रशासकीय मान्यता देवूनही अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याचा आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांना दिला.