स्वस्त धान्य दुकाने उघण्यासाठी परवानगीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:47+5:302021-04-27T04:30:47+5:30
मोफत धान्य वाटपाची गतवर्षीची योजना राबविल्यानंतर दुकानदारांना देऊ केलेले कमिशन अद्याप मिळाले नाही. यंदाही मोफत धान्य वाटपाची राज्य व ...
मोफत धान्य वाटपाची गतवर्षीची योजना राबविल्यानंतर दुकानदारांना देऊ केलेले कमिशन अद्याप मिळाले नाही. यंदाही मोफत धान्य वाटपाची राज्य व केंद्र शासनाने पुन्हा घोषणा केली आहे. त्यात कमिशन मिळणार कसे, याबाबत काहीच उल्लेख नाही. यावर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही केली, तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात सर्व दुकाने बंद ठेवण्यास आदेशित केले. यात स्वस्त धान्य उघडायची की कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबतची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी लेखी आदेश काढण्याची मागणीही केली.
याशिवाय कोरोना संसर्गाने मागील तीन दिवसांत जिल्ह्यातील तीन स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दुकानदारांचे लसीकरण, विमा संरक्षण, पीपीई किट वाटप, मयताच्या वारसास ५० लाखांची आर्थिक मदत आदी मागण्या करण्यात आल्या, अन्यथा १ मेपासून बेमुदत संपाचा इशारा जिल्हाध्यक्ष भिकूलाल बाहेती, अशोक काळे, फारूक पठाण, नवनाथ कानबाळे, राजू यादव, नागेश बांगर आदींनी दिला आहे.