एकाकडून मोबाईलसह रोख १९ हजार रुपये जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:33 AM2021-08-24T04:33:27+5:302021-08-24T04:33:27+5:30

औढा तालुक्यातील गोळेगाव फाटा परिसरात औंढा पोलिसांची गस्त सुरू होती. यावेळी २३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक ...

Seized Rs 19,000 in cash along with mobile from one | एकाकडून मोबाईलसह रोख १९ हजार रुपये जप्त

एकाकडून मोबाईलसह रोख १९ हजार रुपये जप्त

Next

औढा तालुक्यातील गोळेगाव फाटा परिसरात औंढा पोलिसांची गस्त सुरू होती. यावेळी २३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक जण राजबारच्या बाजूला आढळून आला. त्याला नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राम उर्फ सोनू तुळशिराम रावळ (रा. सुकापूर, ता. औंढा) असे सांगितले. यावेळी पोलिसांना त्याच्याजवळ १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल व रोख १९ हजार रुपये आढळून आले. पैसे व मोबाईलबाबत त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच पैसे व मोबाईलबाबत मालकी हक्क दाखविला नाही.

पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून राम उर्फ सोनू तुळशिराम रावळ याच्याविरूद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गु्न्हा नोंद झाला आहे. पोह. ए. जी. पठाण तपास करीत आहेत.

Web Title: Seized Rs 19,000 in cash along with mobile from one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.