उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कारासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:34 AM2018-03-19T00:34:30+5:302018-03-19T00:34:30+5:30
दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या पुरस्कारासाठी महाराष्टÑ राज्यातील एकूण १० (ए. एल. एफ) वस्तीस्तराची निवड केलेली आहे. त्यापैक्ीच हिंगोली येथील तीन संघाची निवड झाली आहे. यामध्ये संभाजी विद्यासागर वस्तीस्तरीय संघाच्या अध्यक्ष मीराबाई देवीदास गायकवाड, सचिव ज्योती दीपक गायकवाड, तर निरंजनबाबा वस्तीस्तरीय संघ मीराबाई दादाराव मुंडे, सचिव मंगल दिनकर तडसे आणि राजमाता जिजाऊ वस्ती संघ अध्यक्ष सविता नंदू लांडगे, सदस्य छायाताई अशोक लांडगे या सर्वांनी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सीओ रामदास पाटील, शहर अभियान व्यवस्थापक पंडित मस्के, प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले होते.
त्यानुसार कार्य करणाºयांना दिल्ली येथे २३ मार्च रोजी होणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यास घेऊन येण्याच्या सूचना शहर अभियान व्यवस्थापकांना दिल्या आहेत. पुरस्कारास निवड झाल्याबद्दल अध्यक्ष बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ पाटील यांच्यासह न.प. कर्मचाºयांच्या हस्ते सत्कार केला. वस्तीस्तरीय संघाने शहरात स्वच्छ भारत अभियाना मध्ये सहभागी होऊन सकाळ, सायंकाळ गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावरील शौचालय थांबविले. तसेच वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठीही पालिकेने केलेल्या सहकार्याची दखल शासनाने घेतली आहे.