‘सेल्फी विथ यमराज’; हिंगोलीत शहर वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 07:44 PM2020-01-16T19:44:15+5:302020-01-16T19:45:42+5:30

यावेळी यमराज आणि चित्रगुप्त यांचा देखावा पाहण्यासाठी शहरात एकच गर्दी झाली होती.

'Selfie with Yamraj'; A unique initiative of the city traffic branch in Hingoli | ‘सेल्फी विथ यमराज’; हिंगोलीत शहर वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम

‘सेल्फी विथ यमराज’; हिंगोलीत शहर वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम

Next

हिंगोली : शहर वाहतूक शाखेच्या वतीने सडक सुरक्षा सप्ताहनिमित्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी हिंगोली शहरातील गांधी चौक येथे १६ जानेवारी ‘सेल्फी विथ यमराज’ हा आगळा-वेगळा उपक्रम जनजागृतीसाठी राबविण्यात आला. यावेळी यमराज आणि चित्रगुप्त यांचा देखावा पाहण्यासाठी शहरात एकच गर्दी झाली होती.

हिंगोली शहरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची कमी नाही, याबाबत जनजागृती करून वाहनचालकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय अनेकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात असली तरी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. दिवसेंदिवस शहरातील होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे वाहतूकीचे नियम तोडू नयेत, तसेच अपघातातील जखमींना कशाप्रकारे मदत करावी, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे टाळावे आणि हेल्मेटचा वापर करावा. तसेच वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवू नयेत याबाबत अनोख्या प्रकारे उपक्रम राबवून वाहनधारकांना माहिती देण्यात आली.

यावेळी अपघातातील जखमीचे यमराज कशाप्रकारे प्राण हरण करीत आहे, तर चित्रगुप्त हे अपघातातील जखमींची माहिती यमराजांना देतानाचा देखावा सर्वांचा आकर्षण ठरणारा होता. सदर उपक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर व शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पोहकाँ आनंद मस्के, राठोड, रवि गंगावणे, घुगे, सांगळे, ठोके, सावळे व यमराज यांची भूमिका राजूसिंह ठाकुर तसेच चित्रगुप्त यांची भुमिका संतोष शिवराम भावीगोत यांनी पार पाडली.

हिंगोलीकरांनी वर्षभरात भरला ८० लाख रूपये दंड!
बेशिस्त वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने मागील वर्षभराच्या काळात ८० लाखांचा दंड व अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु तरी देखील वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे असा अनोखा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती सपोनि चिंचोलकर यांनी दिली.

Web Title: 'Selfie with Yamraj'; A unique initiative of the city traffic branch in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.