वाळू लिलावात ३ साठ्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:13 AM2018-07-12T00:13:55+5:302018-07-12T00:14:13+5:30
तालुक्यातील बोरी सावंत व माटेगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा बुधवारी वसमतमध्ये लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावात ३ साठ्यांची विक्री झाली तर चार साठ्यांना खरेदीदारच मिळाले नसल्याने त्या साठ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. वसमत तालुक्यात अनधिकृतरीत्या केलेले वाळूसाठे जप्त करण्यात आले होते. जप्त केलेल्या साठ्यांचा लिलाव करण्यात येतो. त्या अंतर्गत वसमत तसीलमध्ये बुधवारी लिलाव ठेवण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील बोरी सावंत व माटेगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा बुधवारी वसमतमध्ये लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावात ३ साठ्यांची विक्री झाली तर चार साठ्यांना खरेदीदारच मिळाले नसल्याने त्या साठ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
वसमत तालुक्यात अनधिकृतरीत्या केलेले वाळूसाठे जप्त करण्यात आले होते. जप्त केलेल्या साठ्यांचा लिलाव करण्यात येतो. त्या अंतर्गत वसमत तसीलमध्ये बुधवारी लिलाव ठेवण्यात आला होता.
लिलावात ११८६ ब्रासपैकी २८४, १०० व १७९ ब्रास असे ३ साठे लिलावात विकले गेले. या साठ्यांची एकूण ११ लाख रुपयांची बोली लागली. तीन खरेदीदारांनी साठे बोली लावून उर्वरित साठ्यांच्या लिलावासाठी २० जुलै तारीख ठेवण्यात आली आहे. तहसीलदार ज्योती पवार यांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया पार पडली.