सेनगाव पोलीसांनी काळ्या बाजरात जाणारे २२०० लिटर रॉकेल केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:39 PM2018-09-22T14:39:07+5:302018-09-22T14:39:52+5:30
शुक्रवारी रात्री सेनगाव पोलीसांनी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे २२०० लिटर राँकेल वाहनासह जप्त केले असून तीन आरोपींना अटक केली आहे.
सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यात मागील काही दिवसापासून जीवनावश्यक वस्तू चा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला असून सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे राशन, रॉकेल थेट काळ्या बाजारात विक्री होत आहे. शुक्रवारी रात्री सेनगाव पोलीसांनी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे २२०० लिटर राँकेल वाहनासह जप्त केले असून तीन आरोपींना अटक केली आहे.
सेनगाव तालुक्यात मागील काही दिवसापासून रेनशचा धान्याचा काळाबाजार वाढला आहे.गेल्या महिन्यात पोलीसांनी दोन ठिकाणी कारवाई करुण काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनचे धान्य पकडले होते.हा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा सेनगाव पोलीस ठाण्याचा पथकाने सेनगाव येथे येलदरी टि- पाँईट रस्त्यावर वर एम.एच.३८ई.७५३ या क्रमाचा पीक वाहनात घरगुती वापराचे एकुण ११ टाक्या निळे रॉकेल कारवाई करत वाहनासह जप्त केले.
काळ्या बाजारात विक्रीसाठी अवैधरित्या नेत असलेल्या ८८ हजार रुपये किमतीचे २२०० लिटर रॉकेलसह ११हजार रुपायाचा रिकाम्या टाक्या व पाच लाखा रुपये किमतीच्या वाहनासह चालक शेख मेहबुब शेख जबार रा.महादेववाडी हिगोली, सुभाष आत्माराम खोडवे रा .अंबाळा, शेख मेहबुब शेख अशरफ रा.मस्तानशहा नगर, हिगोली या आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकुर, फौजदार बाबुराव जाधव,फौजदार वंदना विरणक, कर्मचारी अनिल भारती,राजेंद्र बिडवे,धम्मपाल लोणकर आदींचा समावेश होता. या प्रकरणी फौजदार जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ठाकूर करत आहेत.