सेनगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:34 PM2018-06-17T23:34:11+5:302018-06-17T23:35:29+5:30
या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येथील बोगस विद्यार्थी प्रकरणी सेनगाव येथील गट शिक्षणाधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कापडसिनगी येथील दोन विद्यालयांतील बोगस विद्यार्थी प्रकरणाचा तपास सुरू आहे. दहावी परीक्षेत नियमबाह्य विद्यार्थी बसवून शासनाची दिशाभूल केल्यााने नऊ जणांवर गुन्हाही दाखल आहे. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येथील बोगस विद्यार्थी प्रकरणी सेनगाव येथील गट शिक्षणाधिका-यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
अतिरिक्त प्रवेशातून शिक्षणाचा खेळखंडोबा मांडणा-या दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आणि बोगस विद्यार्थी प्रकरणाचा पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. कापडसिनगी येथील संत रेखेबाबा माध्यमिक व संत गजानन महाराज माध्यमिक विधालयातील दहावी परीक्षेती ६०० बोगस विद्यार्थी प्रकरण चांगलेच गाजले. आता सेनगाव येथील गटशिक्षणाधिकारी एस. एस. जगताप यांच्या निलंबनाचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. परंतु मंडळाने एकाचाच निलंबनाचा प्रस्ताव का पाठविला असावा, इतरांवरही कार्यवाही कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षणाचा बाजार मांडणा-या या प्रकरणाचा तपास सेनगाव पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
स्थागुशाच्या पोनि जगदीश भंडरवार यांनी दोन्ही महाविद्यालयांच्या अधिक माहितीसंबधी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पत्रही दिले होते. सध्या स्थागुशाकडून तपास सुरू असून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. लवकरच पुढील कारवाई केली जाईल असे तपास पथकाने सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणामुळेच सेनगाव जि.प. शाळा दहावीचा निकालही घसरला आहे.
---
बोगस विद्यार्थी प्रकरणातील आरोपीस अटक
कापडसिनगी येथील दोन विद्यालयांतील बोगस विद्यार्थी प्रकरणातील एका आरोपीस स्थागुशाच्या पथकाने परभणी येथून १५ जून रोजी अटक केली आहे. आरोपीचे नाव दत्ता मते असून तो खाजगी क्लासेसचालकांना विद्यार्थी पुरवितो, या आरोपीस अटक करण्यात आली असून २० जून पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. अशी माहिती स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच इतर आरोपींनाही अटक केली जाईल, असे भंडरवार यांनी सांगितले.