पाच गावांत मिळणार डिजिटल सहीचा सातबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:39 AM2018-03-14T00:39:40+5:302018-03-14T00:39:43+5:30
सातबारा नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन करण्याचे पहिले पाऊल म्हणून सर्व सातबारांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. मात्र या सातबारातील दुरुस्तीची प्रक्रिया काही ठिकाणी शिल्लक आहे. ती १00 टक्के पूर्ण होताच प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे जिल्ह्यातील ५ गावांत प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल सहीचा सातबारा प्रत्येकाला मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सातबारा नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन करण्याचे पहिले पाऊल म्हणून सर्व सातबारांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. मात्र या सातबारातील दुरुस्तीची प्रक्रिया काही ठिकाणी शिल्लक आहे. ती १00 टक्के पूर्ण होताच प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे जिल्ह्यातील ५ गावांत प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल सहीचा सातबारा प्रत्येकाला मिळणार आहे.
सध्या संगणकीकृत सातबारा मिळत असला तरीही त्यावर सहीसाठी तलाठ्याकडे पुन्हा जावेच लागत आहे. शिवाय अनेक ठिकाणच्या सातबाराची योग्य प्रकारे दुरुस्तीच झाली नाही.
क्षेत्रफळ जुळत नसल्याचे गोंधळ अथवा नावे चुकल्याचे प्रकार अजूनही समोर येत आहेत. या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेल्या पाच गावांची निवड करून या महिन्याअखेरीस या गावांतील नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा मिळणार आहे. हळूहळू ही प्रक्रिया जिल्ह्यातील सर्वच गावांत राबविण्याची तयारीही सोबतच केली जाणार आहे.