कळमनुरी येथील सात कर्मचारी प्रतिनियुक्तीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:38 AM2018-04-29T00:38:10+5:302018-04-29T00:38:10+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयातील सात कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून हिंगोली येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. तर नऊ पदे रिक्त आहेत. ८ वेळा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची विनंती केली; परंतु प्रतिनियुक्त्या रद्द होत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील पंचायत समिती कार्यालयातील सात कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून हिंगोली येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. तर नऊ पदे रिक्त आहेत. ८ वेळा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची विनंती केली; परंतु प्रतिनियुक्त्या रद्द होत नाही.
कर्मचारी कमी असल्यामुळे पं.स.च्या कामकाजात व्यत्यय येत आहे. कामकाजावर परिणाम होत आहे. येथील बी.व्ही. देशमुख वरिष्ठ सहाय्यक हे ४ जुलै २०१२ पासून हिंगोली जि.प. येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. कनिष्ठ सहायक ए.एच. वर्मा हे १८ जुलै २०१४ पासून वाहनचालक, निश्वल कांबळे हे २९ एप्रिल २०१४ पासून, विस्तार अधिकारी एस.डी.गुठ्ठे या १५ मे २०१५ पासून, कनिष्ठ लेखाधिकारी व्ही.ओ. कीर्तनकार हे १३ जुलै २०१७ पासून, कनिष्ठ सहाय्यक सय्यद फरहानोद्दीन ११ जुलै २०१६ पासून तर परिचर एस.एस.स्वामी हे १२ मे २०१६ पासून हिंगोली येथील जिल्हा परिषदेकडे प्रतिनियुक्तीवर आहेत. प्रतिनियुक्ती करण्याचे अधिकार फक्त विभागीय आयुक्तांना आहेत. असे असतानाही मात्र पाच ते सहा वर्षापासून काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. या कर्मचाºयांना तात्काळ कार्यमुक्त करावे, यासाठी येथील गटविकास अधिकाºयांनी ८ ते ९ वेळा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्राद्वारे विनंती केली; परंतु या पत्राची दखल अद्यापपर्यंतही घेतल्या गेली नाही. ७ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर तर ९ कर्मचाºयांची पदे रिक्त त्यामुळे पं.स.च्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्याच कर्मचाºयांवर पं.स.चे दैनंदिन कामकाज करून घ्यावे लागत आहे. प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करून रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.