जप्त सागवान सात लाखांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:54 PM2018-06-15T23:54:51+5:302018-06-15T23:54:51+5:30
तालुक्यातील लोहरा खु.येथील शेतकरी महिलेने परवानगी न घेता सागाच्या लाकडाची कत्तल केल्याप्रकरणी वन विभागाच्या वतीने कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील लोहरा खु.येथील शेतकरी महिलेने परवानगी न घेता सागाच्या लाकडाची कत्तल केल्याप्रकरणी वन विभागाच्या वतीने कारवाई केली आहे. जप्त लाकडांच्या मोजणीत नग ८१४ असून ते ५३ घनमीटर असल्याचे आढळले असून किंमत जवळपास ७ लाख आहे.
सविस्तर वृत असे की, औंढा नागनाथ तालुक्यातील लोहरा खु.येथील महिला शेतकरी अरूणा कोळेकर यांनी औंढा नागनाथ येथील व्यापाऱ्याला सागाची झाडे विकत दिली होती. त्याने वन विभागाकडून कोणतीच परवानगी न घेता कोळेकर यांच्या शेतातील सागाची झाडे परस्पर तोडून तामटी तांडा येथे जमा केली होती. दोन दिवसांपूर्वी याबाबत तक्रार झाल्यानंतर वन विभागाने जप्त करून मोजणी सुरू केली होती. यात वनविभागाने कारवाईनंतर कोळेकर यांना विचारले असता मी औंढा येथील व्यापाºयांना सागाची झाडे विकत दिली आहेत, असे सांगितले. हे व्यापारी कोण? त्यावर कारवाई होणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे.
या झाडांची मोजणी वनधिकारी माधव केंद्रे, वनपरिमंडळ अधिकारी जी.पी. मिसाळ, डी.एफ.जाधव, पी.ए.खरात यांनी केल्यानंतर एकूण ८१४ नग व ५३ घनमीटर असल्याचे सांगितले .