शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२४ हेक्टर बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:02 AM2018-01-17T00:02:05+5:302018-01-17T00:02:09+5:30
कापूस पिकावरील बोंडअळीसह धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२३.५६ हेक्टर बाधित झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : कापूस पिकावरील बोंडअळीसह धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२३.५६ हेक्टर बाधित झाले आहे.
कापूस पिकावर शेदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली. ११ हजार ६२३ हेक्टर कापसावर शेंदरी बोडअळीचा प्रादुर्भाव झाला.
शेंदरी बोडअळी पडलेल्या कापसाचा सर्वे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन केला. तालुक्यातील १७ हजार ७२९ शेतकºयांच्या कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला.
नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ६८०० रुपयाची मदत मिळणार आहे. तालुक्याचा नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.
तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन कापूस पिकाचा शेतकºयांसह फोटो घेतला व पंचनामा घेतला. पंचनाम्यावर सर्वे करणाºया कर्मचाºयांच्या संयुक्त स्वाक्षºया आहेत. नुकसानीचा सर्वे करताना सातबारावर त्या पिकांची नोंद असणे आवश्यक होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त व ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असा सर्वे करण्यात आला.
शेंदरी बोंडअळी कापसावर पडल्याने कापसाच्या उताºयात घट आली. लवकरच शेतकºयांना नुकसानीचे अनुदान मिळणार आहे.
कापसाच्या नुकसानीचा तालुक्याचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकाºयांना ८ जानेवारी रोजी पाठविण्यात आला आहे.