एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचे पगार एक महिन्यापासून लटकले; पुन्हा सुरू झाले हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:35 AM2021-08-17T04:35:10+5:302021-08-17T04:35:10+5:30

श्रावण महिना हा सणासुदीचा महिना असतो. या महिन्यात तरी पगार वेळेवर होईल, असे वाटले होते. परंतु, जुलै महिन्याचा ...

Shimga in Shravan of ST; Employee salaries have been hanging for a month; Recently resumed! | एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचे पगार एक महिन्यापासून लटकले; पुन्हा सुरू झाले हाल!

एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचे पगार एक महिन्यापासून लटकले; पुन्हा सुरू झाले हाल!

Next

श्रावण महिना हा सणासुदीचा महिना असतो. या महिन्यात तरी पगार वेळेवर होईल, असे वाटले होते. परंतु, जुलै महिन्याचा पगार अजूनही झाला नाही. त्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ आणि उसनवारी करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. कोरोना महामारीमुळे प्रवासी प्रवास करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाला म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत आहे, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.

उत्पन्न कमी; खर्च जास्त

nकोरोना महामारीमुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न कमी झाले आहे. कोरोनाआधी प्रवासी संख्या अधिक होती. परंतु, आजमितीस प्रवासी संख्या म्हणावी तशी राहिली नाही.

n कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत असले, तरी प्रवास करण्याचे प्रवासी धाडस दाखवत नाहीत. त्यामुळे एस. टी. महामंडळाला उत्पन्नही मिळत नाही. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, अशी स्थिती आजतरी महामंडळाची आहे. पगार मागे-पुढे होतील, पण सर्व कर्मचाऱ्यांचा पगार केला जाईल, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.

प्रतिक्रिया

उसनवारी तरी किती करायची?

जुलै महिन्याचा पगार अजूनही हातात पडला नाही. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकावा? असा प्रश्न पडला आहे. पगार अजून झाला नसल्यामुळे उसनवारीची वेळ आली आहे. उसनेही पैसे कोणी देत नाही.

- नितीन घोडगे, कर्मचारी

जुलै महिन्याचा पगार वेळेवर झाला असता, तर श्रावणातील सर्व सण उत्साहात साजरे करता आले असते. पण सद्य स्थितीत हातात पैसा नसल्यामुळे सण साजरे करता येत नाहीत. उसनवारी तरी कुठपर्यंत करावी.

- गजानन तांबारे, कर्मचारी

प्रतिक्रिया...

कोरोना महामारीमुळे कर्मचाऱ्यांचा पगार मागे-पुढे झाला आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती सध्या एस. टी. महामंडळाची आहे. कोरोना आधी प्रवासी संख्या अधिक होती. त्यामानाने आजमितीस प्रवासी संख्या नाही. थोडा उशीर होईल, पण कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले जातील. - मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक

Web Title: Shimga in Shravan of ST; Employee salaries have been hanging for a month; Recently resumed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.