शिरड ग्रा. पं. चाैकशीनंतर येथील कारभार वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:44+5:302021-01-15T04:24:44+5:30
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या कामांची पथकांच्या वतीने चाैकशी केली. यानंतर येथील ग्रामविकास अधिकारी यांनी ...
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या कामांची पथकांच्या वतीने चाैकशी केली. यानंतर येथील ग्रामविकास अधिकारी यांनी रजेचे अस्त्र वापरत यातून सुटका मिळविण्यात येथील कारभारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतचा कारभार ठेपाळला असून गावात अनेक ठिकाणी दुर्गंधी व मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत आहे.
शिरडशहापूर येथील ग्रामविकास अधिकारी २५ दिवसांपासून रजेवर आहेत. तसेच येथील कर्मचारी यांचे वेतन मिळाले नसल्याने ग्रामपंचायतचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे गावातील दैनदिन कामे करण्यात येत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील पदभार गटविकास अधिकारी यांच्याकडे आहे. मात्र तालुकातील विविध कामे असल्याने येथील कामाकडे पूर्णवेळ लक्ष देता येत नाही. तसेच येथील ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी लाॅकडाऊन काळात १ कोटी ३० लाख रुपयांची विविध विकास कामे केली. ही कामे बरोबर झाली नसल्यामुळे या कामाच्या चौकशीसाठी समिती नेमली. १८ डिसेंबर रोजी चौकशी समितीला सामोरे जाऊन यानंतर ग्रामविकास अधिकारी अशोक इंगळे हे गावाकडे फिरकले नाहीत. त्यातच सफाई कामगारांचे मानधन थकल्यामुळे सफाई कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून कामावर नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात कचरा भरलेली घंटागाडी दहा दिवसांपासून उभी आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी कचरा आणून टाकल्यामुळे परिसरात सर्वंत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जवळच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, माझी शारीरिक प्रकृती ठिक नसल्यामुळे काही दिवस सुट्टी घेतली आहे. यानंतर याबाबत गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता, तुमच्या गावाचा पदभार कोणताचं ग्रामसेवक घेण्यास तयार नाही. तुम्ही सांगा तो ग्रामसेवक तुम्हाला देतो, असे त्यांनी सांगितले. मागील २५ दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे विविध कामे खोळंबली आहेत. गावात सर्वत्र कचऱ्यांचे ढीग जमा झाल्यामुळे सर्वंत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथे तत्काळ ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांतून हाेत आहे. फाेटाे नं. १०