शिरडशहापूर ३३ के.व्ही. उपकेंद्रास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:57 AM2018-05-13T00:57:26+5:302018-05-13T00:57:26+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. वसमत येथील आग्नीशामक दलास प्रचारण करण्यात आले होते. संध्याकाळी ५.३० वाजता आग आटोक्यात आली.
येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर ए.बी. स्विचवर स्पार्किंग झाल्यामुळे ठिणग्या पडून परिसरातील सुकलेले गवत व काही झाडांनी पेट घेतला. त्यानंतर अग्नीशामक दल वसमतला पाचारण केले. याआधी येथील कर्मचारी व गावातील नागरिक तसेच योगेश रावले यांनी स्वत:च्या फिल्टर केंद्राच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्नीशामक दल वसमत यांनी आग विझवली. यामुळे येथील मोठा अनर्थ टळला. यात ३३ के.व्ही. मधील एक्सप्रेस केबलला आग लागली. उपकेंद्रात पाणी नसल्यामुळे आग विझवण्यासाठी तब्बल दोन तास लागले. आग विझविण्यासाठी अनिल यादव, अब्दुल असद, योगेश रावले, सीताराम गजभार, शिवराज रावले, कर्मचारी, एस.एन. गायकवाड, ऐ.जे. शेख, एम.एम. कदम, एस.पी. जाधव, शिवाजी खरात आदींसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.