जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:52+5:302021-07-18T04:21:52+5:30

कळमनुरी तालुक्यातील खरवड, तरोडा, गौळ बाजार या ठिकाणी या अभियानात कार्यक्रम झाला, तसेच वाई येथे २,५१५ निधींतर्गत १५ लक्ष ...

Shiv Sampark Abhiyan to know the problems of the people | जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान

जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान

Next

कळमनुरी तालुक्यातील खरवड, तरोडा, गौळ बाजार या ठिकाणी या अभियानात कार्यक्रम झाला, तसेच वाई येथे २,५१५ निधींतर्गत १५ लक्ष रुपये किमतीचे पेव्हरब्लॉक व ५ लक्ष रुपये किमतीच्या सीसी रोडचे, वाकोडी येथे १० लक्ष रुपये किमतीच्या अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. यावेळी आ.संतोष बांगर म्हणाले, शिवसैनिकांनी तळगाळातील लोकांपर्यंत पोहोचून समस्या जाणून घ्याव्यात. त्या सोडविण्यासाठी मी सदैव आपल्या साेबत आहे. यावेळी राजेंद्र शिखरे, सभापती फकिरा मुंडे, रेखाताई देवकते, विठ्ठल चौतमाल, बाळासाहेब मगर, श्रीशैल्य स्वामी, परमेश्वर मांडगे, सखाराम उबाळे, भानुदास जाधव, नंदू खिल्लारे, रामभाऊ कदम, राजू संगेकर, मारोतराव कदम, माधव सुरोशे, सुभाष सोनी, रवि शिंदे आदी मोठ्या संख्येने हजर होते.

Web Title: Shiv Sampark Abhiyan to know the problems of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.