शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

By विजय पाटील | Published: March 18, 2024 04:39 PM2024-03-18T16:39:54+5:302024-03-18T16:41:32+5:30

शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या अशा गद्दारांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

Shiv Sena is the mother, destroy who betray the mother; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks | शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेना ही आई, आईशी गद्दारी करणाऱ्यांना ठेचा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

वसमत : आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत. आम्ही जनतेची सेवा करणारे सेवक आहोत. तेव्हा आम्हाला लुबाडून राज्य करू नका. सध्याचे सरकार हे पळपुटे सरकार आहे. शिवसेना आई आहे. या आईशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही येथेच ठेचा असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

वसमत येथे १८ मार्च रोजी कुटुंब संवाद दौऱ्यात ते बोलत होते. मंचावर खा.संजय राऊत, खा.संजय जाधव, माजी खा सुभाष वानखेडे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, नागेश आष्टीकर, सुनील काळे, कन्हैया बाहेती, डॉ. पार्डीकर,श्रीनिवास पोराजवार आदी उपस्थित होते. भाजपा सरकार हे पक्षचिन्ह चोरणारे सरकार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अशा गद्दार पक्षाला आपण निवडून देऊ नका. भाजपवाल्यांनी प्रामाणिकपणा विकला आहे, हे लक्षात ठेवा. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या अशा गद्दारांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेचा वापर करुन भाजप सरकार खंडणी जमा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हळद संशोधन केंद्र मी मंजूर केले. बघा जनता तुम्हाला हळद लावते का? असा घनाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना पक्ष फोडीचे लायसन्स देवून टाका. ते घरफोडे नेते असून त्यांना कमळाऐवजी हातोडा निवडणूक चिन्ह द्या, असा टोला लगावला.

''पन्नास खोके एकदम ओके'' यापूर्वी आपण म्हणायचे ते बरोबरच आहे. यांनी पन्नास खोके घेऊनच भाजपासोबत गेले आहेत. ही गद्दार मंडळी पुढे कोणाच्याही कामाला येणार नाही. तेव्हा आताच यांना इथेच ठेचा, असेही ते म्हणाले.

..मग तुमचा पक्ष शिल्लक राहतो का बघा...
शिवसेनेला ज्यांनी सोडले ते आता मावळे राहिले नाहीत. कावळे झाले आहेत, अशा गद्दारांना येत्या लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्या चित करा. सध्याचे भाजपा सरकार ईडी, सीबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडत आहेत. तर सत्ता आमच्या हाती येणार आहे. तेव्हा तुमाचा पक्ष शिल्लक राहतो का बघा. शक्तीशाली आहोत असे समजत असले तरी जनता काही दुधखुळी नाही. ती तुम्हाला रस्त्यावर आणण्याशिवाय राहणार नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर केला.

Web Title: Shiv Sena is the mother, destroy who betray the mother; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.