कळमनुरी विधानसभेत १३४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:33+5:302021-01-19T04:31:33+5:30

हिंगोली : कळमनुरी मतदारसंघात निवडणुका झालेल्या एकूण १९३ ग्रामपंचायतींपैकी १३४ ग्रामपंचायतींवर आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भगवा फडकला ...

Shiv Sena's saffron on 134 gram panchayats in Kalamanuri assembly | कळमनुरी विधानसभेत १३४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

कळमनुरी विधानसभेत १३४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

Next

हिंगोली : कळमनुरी मतदारसंघात निवडणुका झालेल्या एकूण १९३ ग्रामपंचायतींपैकी १३४ ग्रामपंचायतींवर आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भगवा फडकला असून त्यांनी मतदारसंघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या मतदारसंघात एकूण १९३ ग्रा.पं च्या निवडणुका होत्या. यापैकी २५ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने बिनविरोध भगवा फडकवण्यात यश मिळविले होते. आता प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने ११० ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला आहे. आ.संतोष बांगर यांनी ग्रामीण भागातही शिवसेनेची मजबूत असलेली पकड अधिक घट्ट करण्यासाठी दौरे केले होते. त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत शिवसेनेचे पॅनल उभे राहील, याकडे कटाक्ष ठेवण्यात आला होता. विरोधकांना चारीमुंड्या चित करीत आगामी जि.प. व पं.स.ची पायाभरणी या निवडणुकीच्या रुपाने केली आहे. जवळपास ७० टक्के ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना आ.संतोष बांगर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात माझ्या शिवसैनिकांनी मिळविलेले हे यश अतुलनिय आहे. त्यांच्या मेहनतीच्या बळावरच सेनेने विधानसभेतच नव्हे, तर जिल्ह्यात सरशी मिळविली आहे. वसमत मतदारसंघातही जवळपास ६८ तर हिंगोली विधानसभेत ४५ ग्रामपंचायतींत शिवसेनेने एकहाती यश मिळविलेले आहे. त्यामुळे तमाम शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ असून त्यांनी भविष्यातही अशीच यशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनेने एकहाती बाजी मारलेल्या ग्रामपंचायतींमध्ये बाभळी, असोला बोलडा, चाफनाथ, डिग्रस वंजारी, डिग्रस कोंडुर, डोंगरकडा, खानापूर चित्ता, तोंडापूर, पेठवडगाव, मोरवड, असोलवाडी मोरवाडी, धानोरा (जहांगीर), माळधावंडा, किल्ले वडगाव, निमटोक, शेनोडी, उमरा हातमाली शिवणी, सोडेगाव, येहळेगाव(तुकाराम), रेडगाव, झरा, जवळा पांचाळ, रामेश्वर तांडा, असोला, कोंढुर, भाटेगाव, सुकळी वीर, सेलसुरा, मोरगव्हाण, मुंढळ, सालापूर, येडशी, पोत्रा, डोंगरगाव नाका, जांबरून, माळेगाव, येहळेगाव गवळी, कुंभारवाडी, डोंगरगाव पूल, नवखा, खेड, हिंगणी, हिवराबेल, कळमकोंडा, कनका, कुंडकर पिंप्री, देवाळा, पाझरतांडा, सावळी बैणाराव, बाेरजा, काकडदाभा, जलाल दाभा, आमदरी, ढेगज, हिवरा जाटू, वसई, निशाणा, राजदरी, सोनवाडी, ब्राह्मणवाडा तांडा, जामगव्हाण तर्फे नांदापूर, पळसोना, येळी, कळमकोंडा, माळधामणी, दुर्गसावंगी, सिरसम बु. कान्हेगाव, ईसापुर रमना, .नांदुसा, चिंचाेली, बोरी शिकारी, खेर्डा ,गाडी बोरी, लासीना, अंजनवाडा तांडा, बासंबा, सिरसम खु, सागद, उमदरवाडी, खानापूर चित्ता, सावरगाव बंगला, बउर, चुंचा, आडा, फुटाना, सायाळा राजुरा, पेठ वडगाव, पिंपरी तुर्क, पारोळा, पिंपळखुटा, जोडतळा, जाम राजापूर, चिंचोर्डी, भाटेगाव, गौळ बाजार, सोडेगाव, वसई, गिराम वाडी, येडूत, पांगरा तर्फे लाख, पांगरा हाके या गावांचा समावेश आहे.

Web Title: Shiv Sena's saffron on 134 gram panchayats in Kalamanuri assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.