रिमझीम पावसात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:27 AM2021-02-20T05:27:00+5:302021-02-20T05:27:00+5:30

जय जिजाऊ- जय शिवरायांच्या घोषणेने पुतळा परिसर दणाणला हिंगोली : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने आयोजित सोहळ्यास रिमझिम ...

Shivjanmotsav celebrated with enthusiasm in the pouring rain | रिमझीम पावसात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

रिमझीम पावसात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

Next

जय जिजाऊ- जय शिवरायांच्या घोषणेने पुतळा परिसर दणाणला

हिंगोली : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने आयोजित सोहळ्यास रिमझिम पावसातही शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवपूजन, रक्तदान शिबिर व शिवछत्रपती गौरव पुरस्कार थाटात पार पडला. जय जिजाऊ, जय शिवरायांच्या घोषणेने छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसर दणाणून गेला होता.

दोन दिवसांपासून येथे भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात बदल झाल्याने रिमझीम पाऊस सुरू झाला होता. पण, या पावसातही शिवजन्मोत्सव सोहळ्यावर तसूभरही परिणाम झाला नाही. सकाळी १० वाजता पुतळा परिसरात पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा छायाताई शिवाजीराव मगर यांच्या हस्ते शिवपूजन पार पडले. हा पूजाविधी वंदनाताई आखरे यांनी केला. तसेच सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात १०० शिवप्रेमींनी रक्तदान केले. त्यानंतर मुख्य विचारपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवछत्रपती गौरव पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल साहित्य क्षेत्रात माधवराव जाधव, क्रीडा क्षेत्रात सन्नी पंडित, कृषी क्षेत्रात मधुकर पानपट्टे, सामाजिक क्षेत्रात शेख सुभान अली तर शिक्षण क्षेत्रात शिवराज कोटकर यांना सन्मानचिन्हे, मानपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच कोरोनायोद्धा म्हणून पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके, नगर प्रशासन अधिकारी रामदास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, शिक्षक देवीदास गुंजकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, साई माऊली डब्बा संस्था, गणराज बालगणेश मंडळ, वैष्णव देवी नवदुर्गा मंडळ, वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल कदम, भरारी अन्नछत्र, गायत्री परिवार व एसआरपीएफ जवानांचा सन्मानचिन्ह, मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

दुपारी ४ वाजता लहान बालकांसाठी शिवविचारांवर आधारित शिवगीत, शिवपोवाडा, एकांकिका देखावा स्पर्धा पार पडली. त्यानंतर सायंकाळी ६ ते ७ या वेळेत छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा परिसरात नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी ७ ते १० वेळेत शिवगीत व शिवपोवाड्यांचा कार्यक्रम घेण्यात आला.

दिवसभर झालेल्या विविध कार्यक्रमाला खा.हेमंत पाटील, आ.तान्हाजीराव मुटकुळे, आ.संतोष बांगर, माजी खा.शिवाजीराव माने, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ.गजाननराव घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष मनीष आखरे, ॲड. शिवाजीराव जाधव, छायाताई मगर, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपअधीक्षक यतीश देशमुख, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अनंता जोशी, निरंजन दिवाकर, जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. शिवाजी पवार, ज्योतीताई कोथळकर, सुनीताताई मुळे, विद्याताई पवार, सुनील पाटील गोरेगावकर, मनोज आखरे, खंडेराव सरनाईक, शिवाजीराव ढोकर पाटील, कल्याण देशमुख, भूषण देशमुख, विनायक भिसे पाटील, डॉ.रमेश शिंदे, अ‍ॅड.अमोल जाधव, पप्पू चव्हाण यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्वेता कल्याणकर, ज्ञानेश्वर लोंढे, मानपत्र वाचन पंडित अवचार, माणिक डोखळे यांनी केले तर आभार निता सावके यांनी मानले.

Web Title: Shivjanmotsav celebrated with enthusiasm in the pouring rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.