शिवलीलाचा प्रकल्प नवउद्योजकांना प्रेरणादायी - टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:25 AM2021-01-02T04:25:41+5:302021-01-02T04:25:41+5:30
शिवलीला सेलेब्रेशेन्सच्या उद्घाटन समारंभास टोपे यांच्यासह साखर कारखाना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आ. सतीश चव्हाण, आ. तानाजी मुटकुळे, ...
शिवलीला सेलेब्रेशेन्सच्या उद्घाटन समारंभास टोपे यांच्यासह साखर कारखाना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आ. सतीश चव्हाण, आ. तानाजी मुटकुळे, आ. राजेश नवघरे, आ. विप्लव बाजोरिया, माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकर, माजी आ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आ. गजानन घुगे, माजी आ. रामराव वडकुते, ॲड. सतीश देशमुख, नरेश देशमुख, गजानन देशमुख आदींची उपस्थिती होती.
यावेळी टोपे म्हणाले, राज्यात तरुणांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे. देशमुख यांनी उभारलेल्या या प्रकल्पात ते शेकडो जणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे नवीन व्यवसाय उभारण्याचा दृष्टिकोन तरुणांमध्ये असला पाहिजे. व्यवसायाला महत्त्व देऊन तरुणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उपद्रवी होण्यापेक्षा उद्ममशील व्हा. कष्ट व सचोटी असेल तर देशमुख बंधूसारखे शिवलीला सेलेब्रेशनप्रमाणे यशाचे शिखर गाठता येते, असेही ते म्हणाले.